रविवारी नगरमधील रस्ते सामसूम ; अत्यावश्यक सेवा सुरळीत

। अहमदनगर । दि.11 एप्रिल ।  मध्यंतरी कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने राज्यभर विकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासुन सुरु झालेल्या या विकेंड लॉकडाऊनला नागरीकांनी 100 टक्के  प्रतिसाद दिला असून रस्ते जरी सामसुम असले तरी यामध्ये अत्याववश्यक सेवा मात्र सुरळीत सुरु आहे.

नगरकरांनी विकेंड लॉकडाउनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शुक्रवार संध्याकाळपासून ते शनिवार आणि रविवारी या दोन दिवस सर्वच रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे थांबली असून, सर्वत्र शुकशुकाळ आहे.

जिल्ह्यामध्ये रुग्णालये, किराणा, मेडिकल, शिवभोजन पार्सल आदी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना 100 टक्के बंदच आहेत.  लसीकरण केंद्र व शिवभोजन केंद्रावर काही प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत असली तरी सोशल डिस्टसिंग आणि मास्कचा वापर नागरीक करत आहे. 




संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी शहरात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून वीकेंड लॉकडॉऊनला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. 


नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आल्याने नागरीकांनीही घरोबाहेर जाण्याचे टाळले आहे. रस्त्यावर तैनात असलेले पोलीस नजरेस पडणार्‍या नागरिकांची चौकशी करीत  असल्याने कोणतीही रिक्स नको असाच नागरीकांचा सुर आहे.



कामगार, सरकारी कर्मचारी तसेच ज्यांना हॉस्पिटलच्या संदर्भात काम आहे. त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जे विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले त्यांना समज देत पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. 

 



शहरातील कापड बाजार, नवी पेठ, दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, माळीवाडा, सावेडी, बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, मुकुंदनगर, केडगाव आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एसटी बस सेवा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांनी प्रवास टाळल्याने बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी नसल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post