गोवशीय जनावरांची सुटका ; ­ एक पोलिसांच्या ताब्यात

। अहमदनगर । दि.11 एप्रिल ।  कत्तल करण्यासाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांना दाटीवाटीने कोंडून त्यांना खाण्याची, पाणी पिण्याची सोय न करता त्यांना क्रूरतेने  बांधून ठेवलेल्या जनावरांचे पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई परिसरातील बाबा बंगाली चौकात शनिवारी (दि. 10) रोजी रात्री केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की झेंडीगेट परिसरातील बाबा बंगाली चौक येथे जनावरांची कत्तल करण्यासाठी काही जनावरे क्रूरतेने बांधून ठेवले आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत दहा हजार रुपये किमतीच्या जर्सी गाय जर्सी गाय गोर्‍हे व एकवीस हजार रुपये ताब्यात घेतले. जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये जमा केले.

तसेच मुजाहिद मुस्ताक शेख (वय 34) याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस हवालदार दिपक साबळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी रक्षा शोध सुधारणा 1995 चे कलम 5 (1) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सन 1960 चे कलमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post