रिक्षा अपघातात एक ठार

। अहमदनगर । दि.11 एप्रिल । भरधाव वेगातील रिक्षा (क्र एम एस 16 सी एफ.2152 ) झाडावर आदळून झालेल्या अपघातात रिक्षा चालक ठार झाला असून रिक्षातील तीन महिला जखमी झाल्या. ही घटना देऊळगाव सिद्दी ते वाळकी जाणारे रोडवर वाळकी, मेजर वस्ती जवळ घडली.



या अपघातामध्ये रिक्षा चालक बाळू विलास खंडागळे हा मृत झाला. रिक्षातील मयुरी विकास रणदिवे. मालन बाबुराव मगर, सविता किसन रणदिवे या जखमी झाल्या.



याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी गौरव विकास रणदिवे (रा.सिद्धार्थनगर बौद्ध वस्ती, नगर) यांच्या फिर्यादीवरून रिक्षा चालक बाळू विलास खंडागळे (राहणार मोहोज देवढे) विरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार ससाणे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post