। अहमदनगर। दि.29 एप्रिल । नगर जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शिर्डीमध्ये 2 हजार रुग्णांना आरोग्य सुविधा मिळेल असे जम्बो ऑक्सिजन सुविधांचे व 200 आयसीयू सुविधांचे कोविड सेंटर उभारावे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी मागणी खा.लोखंडे यांनी केली आहे.
त्याला मान्यता मिळाल्यानंतर नगर जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांना सेवा देणे अधिक सोयीचे होईल, असे शिवसेनचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.येथील शासयकीय विश्रामगृहावर ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक संजय शेंडगे, संपत नलावडे आदी उपस्थित होते.
खा.लोखंडे म्हणाले की, शिर्डीमध्ये ज्या वेळेला प्लेगची साथ होती, त्या वेळी प्रत्यक्ष साईबाांनी रुग्णसेवा केली, पण आज सर्व आरोगय सेवा सोयीसुविधांनी सज्ज आहे. त्यामुळे शिर्डीमध्ये जम्बो कोविड सेंटर उभे राहिले तर रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. जिल्हयाम कोविड बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याचा संपुर्ण ताण प्रशासनावर येत आहे.