मागील वर्षीही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी होती. पुढच्या वर्षी यात्रेत उत्साहाने सहभागी होऊ अशी भाविकांना आशा होती. पण या वर्षी मात्र कोरोनाने अधिक भयंकर रुप घेतल्याने आगडगावची काळभैरवनाथ दर्शनव्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावच्या भाविकांनी गावात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवस्थानद्वारे मदत : आगडगाव येथे सुरु करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रास देवस्थानच्यावतीने मदत दिली जात आहे. निवास भोजन तसेच सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. देवस्थानची रुग्णवाहिकाही मोफत सेवा करीत आहे. गरजू रुग्णांना चोवीस तास सेवा देण्याचे महत्तचे काम करीत असल्याने पंचक्रोशतीतील गावांमध्ये चांगली सुविधा झाली आहे. या सर्व सुविधांसाठी भाविकांनी ऑनलाईन पध्दतीने मदत द्यावी, असे आवाहन ट्रस्टच्या विश्वस्ताच्या ऑनलाईन बैठकीत करण्यात आले आहे. देवस्थानच्या (www.bhairavnathtrust.org) या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन देणगी मदत स्वीकारली जाते.