। मुंबई । दि.01 मार्च । राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचं चूल मांडो आंदोलन करणार आहेत. गॅस, पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन करण्यात येणार असून राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या आंदोलनात रुपालीताई चाकणकर पुण्यातून सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चूल मांडा आंदोलनात सहभागी होणार असल्याचं रुपालीताई चाकणकर यांनी सांगितलं.