टेम्पोच्या धडकेत पादचारी जागीच ठार

। अहमदनगर ।  दि. 18 ।  नगरकडून केडगाव कडे भरधाव वेगात जाणार्‍या टेम्पोने पायी चालणार्‍या पादचार्‍यास धडक दिली. या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी ( दि. 15 ) रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास कायनेटिक चौक येथील आरोही हॉटेल समोर घडली. 

 

याबाबतची अधिक माहिती अशी की आरिफ इलियास पठाण ( रा. रवीश सारस कॉलनी, कायनेटिक चौक, नगर पुणे रोड अहमदनगर )  हा घरातून चौकात कडे पायी जात असताना हॉटेल आरोही समोर भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पो क्रमांक एम शह 16  ए वाय 6706  ने धडक दिली. धडक इतकी जोरात होती आरिफ पठाण याचा जागीच मृत्यू झाला. 

 

अपघात होताच टेम्पो चालक टेम्पो घटनास्थळावर सोडून पसार  झाला. याप्रकरणी आसिफ इलियास पठाण ( वय 26 रा. रविश कॉलनी कायनेटिक चौक) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अपघाताच्या होण्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post