। अहमदनगर । दि. 18 । पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी श्रीकांत आनंदा मोरे राहणार प्रबुद्ध नगर आलमगीर यास दहा वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैरी व भादवि कलम ३४१ प्रमाणे एक महिना सक्त मजुरी पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
श्रीकांत मोरे याची पत्नी त्याच्यापासून अलिप्त राहत होते तीन ऑगस्ट २०१७ रोजी शाळेतून मुलास आणण्याकरता एका शिक्षकाबरोबर जात असताना श्रीकांत याने तिला रस्त्यात थांबवले शिक्षकास निघून जाण्यास सांगितले त्यानंतर त्याने खिशातून सल्फ्युरिक ॲसिड बाटली काढून मी आता तुला ठार मारतो म्हणून तिच्या अंगावर ॲसिड टाकले. ऍसिडमुळे ती गंभीर भाजली याप्रकरणी पोलीस ठाण्यात श्रीकांत मोरे याच्याविरुद्ध भादवि कलम 307 प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी श्रीकांत अटक केली. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले
या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले खटल्यात प्रत्यक्षदर्शी शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तपासाधिकारी, विशेष न्यायदंडाधिकारी, पंच व साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून ग्राह्य धरला श्रीकांत दोषी ठरवून त्यास दहा वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अधिकारी मनीषा केळकेंद्रे / शिंदे यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हवालदार थोरात यांनी सहकार्य केले.
