टँकरच्या धडकेत दोन ठार

। अहमदनगर ।  दि. 18 ।  नगर भरधाव वेगातील टँकरने समोरून येणार्‍या मोटरसायकलला धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील दोन स्वार जागीच ठार झाले. ही घटना बेंनवडी शिवारात राशिन रोडवर बुधवारी ( दि. 17 ) साडेबारा वाजता घडली.  

 

याबाबतची माहिती अशी की  टँकरने (क्र. एम एच 12 एन एक्स 1956 ) येणार्‍या मोटरसायकलला धडक दिली.  या धडकेत आजिनाथ भानुदास माहुलकर ( वय 38 ) प्रताप मोहन शिंदे ( वय 37. दोघे रा. चिलेवाडी कर्जत )  हे ठार झाले. 

 

याप्रकरणी अनिल भानुदास माहुलकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार सातपुते हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post