। बीड । दि.01 मार्च । पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झाला आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.
संजय राठोड यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा बंजारा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नसतानाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.
त्यामुळं जोपर्यंत त्यांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना आरोपी म्हणू नये. अशी मागणी बंजारा समाजातील तरुणांनी केलीय.