मनसेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांचा सत्कार

। अहमदनगर । दि.01 मार्च । मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अहमदनगरच्या वतीने शहरातील सुरू असणार्‍या आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय मालिका तुझ माझ जमतय यातील कलावंतांचा सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला.


शहराच नावलौकिक करणार्‍यांचा हा आदर यावेळी व्यक्त करण्याची संधी मिळाली. यावेळी मोहनीराज गटणे, राहूल सुराणा, अमित रेखी, मालिकेचे दिग्दर्शक कुलकर्णी सर, विराज मुनोत, अंकुश काळे, यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मालिकेमधील कलाकार तंत्रज्ञ तसेच सहकार्य करणारे उपस्थित होते.


यावेळी शहरातील कलावंताचा सत्कार करताना नक्कीच आनंद मिळतो पण आपल्यासारखे प्रसिद्ध आणि नामवंत कलावंत आमच्या शहरात येतात कार्य करतात याचाही आम्हाला जास्त आनंद होतो सर्वांना आपल्या अदांनी घायाळ करणारी पप्मी म्हणजेच प्रतिक्षा जाधव यांचा यावेळी स्वागत आणि सन्मान करण्यात आला.  


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा महिलाध्यक्षा अँड.अनिता दिघे, गणेश शिंदे, संकेत होशिंग समर्थ उकांडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post