जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने सभापती घुले यांचा सत्कार

। अहमदनगर । दि.15 मार्च । अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्यावतीने मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचा सत्कार आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी संजय चोपडा, दत्ता भाऊ वामन, विलास कराळे, अशोक औशिकर तारकपूर स्टॉपचे अध्यक्ष नाशीर खान, कार्याध्यक्ष कय्युम सय्यद, शेख आरिफ, समीर शेख , फयाज सय्यद,  मोईम शेख, साजिद शेख, फरान शेख ,अर्षद सय्यद,अझर शेख हे उपस्थित होते.



यावेळी बोलताना घुले म्हणाले की, शहराचा विकासा बरोबर ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्‍न देखील सोडविण्यावर आपण भर देणार असून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post