केडगाव येथून तरुण बेपत्ता

। अहमदनगर । दि.15 मार्च । घरात कुणाला काही एक न सांगता 28 वर्षीय तरुण विशाल हरिदास रोहकले हा घरातुन निघुन गेला. तो अद्याप परतला नाही.  


या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सागर हरिदास रोहकले (वय 35, रा.एकनाथ नगर केडगाव) यांनी दिलेल्या माहितीवरुन हरविल्याचे नोंद केली आहे.


विशाल हा एमआयडीसी येथील एक्साईड बॅटरीमध्ये कामाला असुन तो रंगाने सावळा, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा गोल, अंगामध्ये निळसर जिनची पॅन्ट परिधान केलेला आहे.


या बाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फोन नं.2416117 येथे संपर्क करावा. अधिक तपास पोलिस नाईक डोळे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post