। अहमदनगर । दि.15 मार्च । औरंगाबाद रोडवरील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कंटेनर मधून कुणीतरी अज्ञात चोराने 31 हजार 247 रुपये किमतीचे डीझेल चोरून नेले ही घटना सोमवारी दिनांक 14 पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली,
याबाबतची अधिक माहिती अशी की गणेश पंढरीनाथ लहाने ( वय 35 रा. लोणीकंद वाघोली पुणे ) हे त्यांचा कंटेनर ( क्र. एम एच १२ आर एन 2003 ) घेऊन जात असताना त्यांनी औरंगाबाद रोडवरील एका पेट्रोल पंपावर जवळ उभा केला व केबिन मध्ये झोपले असता
कुणीतरी अज्ञात चोराने डिझेलच्या टाकीचे झाकण तोडून आतील ३१ हजार २४७ रुपये किमतीचे डिझेल चोरून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गणेश लहाने यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 379 प्रमाणे या गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस हवालदार थोरवे हे करीत आहेत.
