आज ५०९ रूग्णांना डिस्चार्ज तर ४५६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आज ५०९ रूग्णांना डिस्चार्ज तर

 ४५६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०४ टक्के


। अहमदनगर ।  दि. 18 ।  जिल्ह्यात आज ५०९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ४३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०४ टक्के इतके झाले आहे. 

 

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९१२ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२६ आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३, अकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ०५, कोपरगाव २५, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०५, पारनेर १८, राहाता ०१, राहुरी ०३, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर २८, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, अकोले ०४, जामखेड ०१, कर्जत ०२,  कोपरगाव ४८, नगर ग्रामीण ११, नेवासा ०६,  पारनेर ०५, पाथर्डी ०२, राहाता ४३,  राहुरी ०७, संगमनेर १५, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. मनपा १३, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपर गाव ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०६, पारनेर ०२, पाथर्डी १०,  राहाता ०५, राहुरी ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४८, अकोले १६, जामखेड ०९, कर्जत ०४, कोपरगाव ४७, नगर ग्रामीण १९, नेवासा १८, पारनेर १५, पाथर्डी ०२,  राहाता ५८, राहुरी ४०, संगमनेर ४३, शेवगाव ४२, श्रीगोंदा १५,  श्रीरामपूर २१ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:७८४३४

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२९१२

*मृत्यू:११८४

*एकूण रूग्ण संख्या:८२५३०


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक १८ मार्च, २०२१  


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा  

Post a Comment

Previous Post Next Post