। अहमदनगर । दि. 20 मार्च । ज्या-ज्या जिल्ह्यात पदाधिकारी निवडीबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यात लक्ष घालून चुकीच्या व्यक्तींची नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळांना दिले.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीत पक्षाच्या गांधी भवन येथे जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पटोले बोलत होते. बैठकीनंतर नगरचे बाळासाहेब भुजबळ यांचे शिष्टमंडळ नाना पटोले यांना भेटले, त्यावेळी याही प्रकरणात लक्ष घालू, असे आश्वासन पटोले यांनी दिले.
नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नवीन नियुक्ती करतांना ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना पूर्वसूचना न देता नगर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांत फूट टाकण्याच्या हेतूने ब्लॉक कमिटीला डावलूनही त्यांच्यात फूट पडत नाही. म्हटल्यावर भुजबळ यांना पूर्व सूचना न देता त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याची कृती शहरातील पक्ष संघटनेत फूट टाकण्याचा प्रयत्न करणारे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली. या विरोधात भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे तक्रार केली आहे.