पेडगाव किल्ल्यात शौर्यदिनी 105 युवकांनी केले रक्तदान

। अहमदनगर । दि. 20 मार्च । 17 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन असल्याने शौर्यदिन साजरा केला. टीम धर्मवीरगडने शंभूरायांना अभिवादन करण्यासाठी हे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन पेडगाव किल्यात केले होते. यासाठी जनकल्याण रक्तपेढी नगर यांनी सहकार्य केले.


डॉ. दिलीप दाणे, डॉ. विलास मढीकर, गजेंद्र सोनवणे, उज्ज्वला शिंदे, सुलभा पवळ, मनीषा जोशी, बाळासाहेब खरपुडे, चंद्रकला फंड, किशोर यादव यांनी साहाय्य केले. शिव-शंभूप्रेमींनी 105 पिशवी रक्तदान केले. टीम धर्मवीरगडतर्फे किल्याचे संवर्धन-जतन, माहितीपट, मोहिमा तसेच कार्यक्रम आयोजित करत किल्याचा इतिहास सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोच करत आहेत. 

 

या कार्यासाठी डॉ. नीलेश खेडकर, प्रतीक पाचपुते, प्रा. राजेश बाराते, कालिदास कोशिंबिरे, राहुल परकाळे, विनायक डाळिंबकर, राहुल सुपेकर, योगेश वाघमोरे, किरण कवडे, लाला अवचर, वैभव पाचपुते, काळसकर, अक्षय धारकर, आकाश लगड, प्रशांत यादव, धनंजय कुतवळ, तेजस खेडकर, शुभम गोरे, महेश मुळे, शुभम पवार, प्रवीण राऊत यांनी योगदान दिले.   पेडगाव ग्रामस्थ व टीम धर्मवीरगड विभागांनी योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post