टाकळीभान येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

। श्रीरामपूर ।  दि. 18 । तालुक्यातील टाकळीभान येथील इंदिरानगर परिसरात राहात असलेल्या विवाहित महिलेने पंख्याच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

 

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सारीका नवनाथ धनवटे (वय २१) या विवाहित महिलेने काल दुपारच्या वेळी घरी कोणीही नसताना राहात्या घरी सिलिंग फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या महिलेचे पती नवनाथ धनवटे घरी आल्यावर त्यांना पत्नीने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

 

याबाबत श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल अय्युब शेख यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह श्रीरामपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. या महिलेचे एका वर्षापूर्वी लग्न झालेले होते.

Post a Comment

Previous Post Next Post