स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड!

। अहिल्यानगर । दि.02 मार्च 2026 । स्वस्तामध्ये सोने देतो असे आमिष दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून सहा लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेखर उर्फ बंटी संजय पाडळे (वय 32 वर्षे, रा. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), किरण बंडू काळे (वय 29 वर्षे, रा. नागफणीवस्ती, नेवासा ता.नेवासा जि. अहिल्यानगर), भाऊसाहेब छगन भोसले (रा.नेवासा फाटा, ता.नेवासा), सचिन उर्फ गटण्या पवार (रा. खळवाडी, नेवासा खु. ता.नेवासा) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.


प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी अरविंद सिध्दप्पा हलसांगी रा. लेन.नं.02 गणेशनगर, नारायण अपार्टमेंट वाघोली, जि.पुणे यांचा बंटी पाडळे याने तसेच आठ ते दहा इसम यांनी संगनमत करुन स्वस्तात सोने देतो असे सांगून हॉटेल शिवमजवळ कच्च्या रस्त्याने बोलविले. तेथे आदित्य नागटिळे, अशोक शहाणे व मला काठीने व लाथाबुक्याने मारहाण करुन रोख रक्कम, अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल, 2 विवो मोबाईल, 2 नग सोन्याच्या अंगठ्या असे एकुण 15 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतली.


पोलीस पथकाने दरोड्याचे गुन्ह्यामधील आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा शेखर उर्फ बंट्टी याने इतर साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. माळी चिंचोरा फाटा परिसरात सापळा रचून थांबले असता, पथकास सदर परिसरात दोन इसम संशयीतरित्या फिरताना दिसून आले. तेव्हा पथकाने त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. गुन्ह्याचे वेळी वापरलेली 35 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व दोन जिवंत काडतुसे, 30 हजारांचा एक मोबाईल, सहा लाख रोख रक्कम असा एकुण 6 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांनी केली आहे.

 👉 क्लीक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post