बंद घराचे कुलूप तोडून 2 लाख 95 हजाराचा ऐवज लंपास


। अहिल्यानगर । दि.02 मार्च 2026 । बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी गोविंद बलराज बेहेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहेल हे उपचारासाठी नाशिक येथे गेले होते, त्यामुळे त्यांचे घर काही काळ बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. 

घरामध्ये ठेवलेली 80 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीचे विविध दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. माहिती मिळताच बेहेल यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

👉 क्लीक करुन वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post