। अहमदनगर । दि.01 मार्च । राहत्या बंद घराचे कुलुप तोडून दोन अनोळखी चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना नगर स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनी मधील हरी निवास येथे रविवारी (दि.28) रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, इश्वरलाल सिंग सरदारीलाल सलुजा (वय 55, रा.हरी निवास सथ्था कॉलनी, स्टेशनरोड) यांच्या राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप दोन अनोळखी इसमांनी तोडुन आत प्रवेश केला. आतिल सामानाची उचका पाचक केली.
बेडरुममधील कपाटामध्ये असेलेले सोन्या चांदीचे दागिने अंदाज किंमत दहा हजार व 5 हजार किंतीचे कानातील झुमके तसेच रोख रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी इश्वरलाल सरुजा यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 457,380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉस्टेबल ढगे करीत आहे.