। अहमदनगर । दि.01 मार्च । शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टराच्या नावाने बनावट ईमेल आयडी व बनावट नावे सिमकार्डव्दारे बजाज फायनान्सला 50 लाख रुपये लोनची मागणी करणार्या चौघा जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे.
तेजस प्रमोद मोगले (वय 32 रा.सिडको महानगर, औरंगाबाद), शुभम रमेश नंदगवळी (वय 26 रा. गुलमंडी, औरंगाबाद), अमोल सतीश सोनी (वय 33 वर्षे रा.बसवंत नगर देवळाई, औरंगाबाद), सतीश बापू खांदवे (वय 27, रा.वाकोडी, अहमदनगर) या चौघांनीही संगनमताने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहे. तसेच, नमुद गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अज्ञात इसमाने फिर्यादी डॉक्टरांच्या नावाचा वापर करुन खोटे ईमेल आयडी तयार करुन, बनावट डॉक्युमेंट वापरुन मोबाईल नंबर 9404040230 असा घेतला. त्यानंतर सदर बनावट मोबाईल क्रमांकाचा वापर करून बजाज फायनान्सकडे बनावट कागदपत्र मेलद्वारे सादर करुन 50 लाख रुपये लोनची मागणी केली.
त्यावरुन तक्रारदारांनी अज्ञात इसमांविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी नमुद गुन्हयांबाबत तांत्रिक विश्लेषण करुन चौघांना ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे पोहेकॉ योगेश गोसावी, पोहेकॉ उमेश खेडकर, पोना मलिकार्जुन बनकर, पोना दिगंबर कारखिले, पोना राहुल हुसळे, पोना विशाल अमृते,
पोको अभिजीत अरकल, पोकॉ राहुल गुंडू, पोकॉ अरुण सांगळे, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ समप्राट गायकवाड, पोकॉ अमोल गायकवाड, चापोहेकां वासुदेव शेलार, मपोना सविता खताळ, मपोना स्मिता भागवत, मपोकॉ पुजा भांगरे, मपोकॉ दिपाली घोडके, पोकॉ उर्मिला ’चेके, मपोकॉ प्रितम गायकवाड, मपोकॉ सीमा भांबरे सर्व नेम. सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर यांनी केली आहे.