। नवी दिल्ली । दि.01 मार्च । आता कोरोना लस खासगी रुग्णालयात 250 रुपयांना मिळणार आहे. महाराष्ट्रामधील जवळपास 775 हॉस्पिटलमध्ये ही लस देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारनं दि.16 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु केला होता. तर आता दुसर्या टप्यामध्ये दि.1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं 10 हजार खासगी रुग्णालयांची निवड केली आहे.
केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्रातील 659 तर केंद्र सरकार आरोग्य योजनेअंतर्गत 116 खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी एका डोससाठी 250 रुपये खर्च येणार आहे.
कोविन अॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणार्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य
योजनेतील महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची यादी