‘गिगाबाईट’च्या वतीने डोंगरे यांचा सन्मान

। अहमदनगर । दि.01 मार्च । नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडीबद्दल व बहुमोल सामाजिक योगदानाबद्दल नानासाहेब डोंगरे यांचा केडगाव येथील गिगाबाईट कॉम्प्युटरच्या वतीने संचालक बाबासाहेब वायकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

 
 
कार्यक्रमा दरम्यान अकोळनेरचे नूतन उपसरपंच प्रतीक शेळके यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत पालवे, माजी सैनिक किरण फाटक, किसनराव बोठे, चंद्रकांत धोत्रे, गणेश धोत्रे यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.
 
 
सत्कारास उत्तर देताना डोंगरे म्हणाले की, सामाजिक कार्याची सुरुवातीपासूनच आवड होती. याला आता राजकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना येणार्‍या अडचणी दूर होण्यास मदत होईल. निमगाव वाघा गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर विश्‍वास दाखवून मला ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याची संधी दिली. या संधीचे निश्‍चितच सोने करू. गावच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.
 
 
यावेळी बोलताना  वायकर म्हणाले की,  डोंगरे यांनी सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, क्रीडा, तसेच व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक भावनेतून नागरिकांचे प्रश्‍न सोडवित आहेत. 
 
 
त्यांचे तीनही अपत्य कुस्ती व ज्युदोमध्ये राष्ट्रीय पातळीवर पदक विजेते ठरले आहेत. अशा ग्रामीण भागातील बहुजन समाजातील माणसाने गावासाठी समाजकारणात प्रवेश करून आता झालेल्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले, याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post