अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वृध्द ठार

। अहमदनगर  । दि.14 फेब्रुवारी ।  भरधाव वेगात जाणार्‍या चारचाकी वाहनाने 68 वर्षीय पादचारी वृध्दास धडक दिली. या अपघातात पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना नगर-पुणे रोडवरील वाघुंडे गावच्या शिवारात हॉटेल सौरभ समोर शनिवारी (दि.6) रोजी घडली.

 

याबाबतची अधिक माहिती अशी की,नगर-पुणे रोडने भरधाव वेगात जाणार्‍या अज्ञात चार चाकी वाहनोन पायी जाणार्‍या 68 वर्षीय वृध्दास धडक दिली. या धडकेत वृध्दाचा मृत्यू झाला. मृत्य वृध्दाची अद्याप ओळख पटली नाही.


या प्रकरणी सुपा पोलिसांनी नंदकिशोर पांडुरंग गाडीवकर यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 184,134, 279, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास सहायक फौजदार साबळे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post