बंद घराचे कुलुप तोडून सव्वा लाखाची चोरी

। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी ।  राहत्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरानी आज प्रवेश केला. बेडरुम मधील लोखंडी कपाटातील 1 लाख 14 हजार रुपयाचे दागिने, रोख  रक्कम असा ऐवज चोरुन नेला.

 

हि घटना जामखेड ते करमाळा रोडवर, नान्नज येथे शुक्रवारी (दि.12) सकाळी आठ ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.


या बाबतीची अधिक माहिती अशी की, हनुमंत कल्याण गाडेकर (वय 38, गोपाळपुरी वस्ती, नान्नज, जामखेड) हे कुटुंबासह गावाला गेले असता.


कोणतरी अज्ञात चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, आतील सामानाची उचका पाचक केली.


बेडरूममधील लोखंडी कपाटातील 10 ग्रॅम वजनाचे नेकलेस, 10 ग्रॅम वजनाच्या दोन आंगठ्या, कानातील फुले व झुबे 5 ग्रॅम, 7 ग्रॅम वजनाची वोरमाळ, 1 ग्रॅम सोन्याची आंगठी, 9 गॅ्रमचे गंठण, 25 ग्रॅमचे गंठण चोरुन नेले.


या प्रकरणी जामखेड पोलिसांनी हनुमंत गाडेकर यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 454, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक राजू थोरात हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post