RTI नियमांवर अण्णा हजारे आक्रमक


। अहिल्यानगर । दि.21 जुन 2026 । देशात आणि महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्यातील बदलांवर नाराजी दर्शवली आहे. 

राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला असून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार (RTI) कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात जाहीर केलेल्या नव्या नियमांवरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. माहिती अधिकार चळवळीतील प्रमुख चेहरा आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांवर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे.  

https://epaper.evijaymarg.com/edition/34/vijaymarg-28-05-26


Post a Comment

Previous Post Next Post