गुजरातच्या सुरतमध्ये दोन बसेसचा भीषण अपघात...


। गुजरात। दि.02 जुन 2026 । गुजरात मधील सुरत जिल्ह्यातून एक बातमी पुढे येत आहे. सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळून जाणार्‍या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. यामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी काही प्रवासी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हा अपघात इतका भयानक होता की, धडकेनंतर एक एसटी बस थेट महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात बसला भीषण आग लागली. या घटनेमध्ये 6 प्रवाशांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जोरदार टक्कर होताच एक बस हायवेवर पलटी झाली आणि एका मोठ्या धमाक्यासह पेट घेतला. आग इतकी वेगाने पसरली की आतील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसल्याची माहिती पुढे येत आहे. हा भीषण अपघात बारडोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावाच्या दरम्यान झाला. 

Post a Comment

Previous Post Next Post