। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी । महावितरण कार्यालयात लघुशंका करू नको, असे म्हटल्याच्या रागातून वायरमनला पट्ट्याने व लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता घडली. निखिल बाळकृष्ण धंगेकर (रा. तेलीखुंट, नगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत वायरमन अमोल भानुदास शेळके (रा. निंबळक, ता. नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेळके हे महावितरणच्या तेलीखुंट येथील कार्यालयात कर्तव्यावर असताना निखिल धंगेकर हा तेलीखुंट पॉवर हाऊसच्या पाठीमागे महावितरण कार्यालयामध्ये येऊन लघुशंका करून लागल्याने
त्यास येथे लघुशंका करू नको, असे म्हटल्याचा राग येऊन त्याने शेळके यांना व त्यांचे सहकारी कर्मचारी, अधिकारी यांना शिवीगाळ, दमदाटी करून पट्टयाने व लाथाबुक्कयानी मारहाण करूनचाकुचा धाक दाखविला, असे शेळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी धंगेकर याच्याविरूध्द भादंवि कलम 353, 332, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
