खर्डा येथील किल्ल्यात सापडले २५० ऐतिहासिक दगडी तोफगोळे

। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी । जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. खर्डा किल्ल्यावर तोफगोळे आढळून आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तोफगोळे पाहण्यासाठी गर्दी उसळली होती..

 

नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्यातील उत्खनन करताना जुन्या काळातील तोफगोळे सापडले आहेत. या बाबत माहिती अशी की, खर्डा येथे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभाग नाशिक यांच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू आहे.  

 

खर्डा येथील किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना पुरातन काळातील तोफगोळ्यतील हे गोळे सापडले आहेत. हे तोफगोळे सापडल्यामुळे इतिहास प्रेमीमध्ये एक मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. १७९५ साली येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या लढाईत येथील तोफगोळ्यांचा उपयोग झाला असण्याची शक्यता इतिहासतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषत: इसवी सन १७९५ निजाम आणि मराठे यांच्या युद्धामध्ये तत्कालीन तोफखान्याचा प्रमुख यांनी या तोफगोळ्यांचा वापर केला होता. 

Post a Comment

Previous Post Next Post