। अहमदनगर । दि.06 फेब्रुवारी । मेडिकल दुकानातील कांऊटरवरून मोबाईल चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. सुमित रावसाहेब सरोदे (वय 19, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे.
मेडिकल दुकानातून मोबाईल चोरी गेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरिक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सुमित सरोदे याने केला आहे.
त्यांच्या सूचनेवरून पोहेकॉ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकॉ रोहिदास नवगिरे आदींच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले.
