। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी । शेवगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील पांडुरंग हरिश्चंद्र भागवत (वय-48 वर्षे) गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे तसेच मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या शेती कर्ज परत फेडू न शकल्यामुळे अडचणीत सापडून निराश झाले होते.
या नैराश्येतून पांडुरंग भागवत यांनी गेल्या 7 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली. त्यासंदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
