ना.शिंदे यांच्याकडे निंबळक ते निमगाव वाघा रस्त्यांच्या डॉ.पवारांनी मांडल्या व्यथा

। नगर । दि.14 फेब्रुवारी । येथील निंबळक ते निमगाव वाघा पर्यंतचा होत असलेला सदरच्या संदर्भात विविध समस्या असल्याचे निवेदन नामदार एकनाथ शिंदे यांना डॉ.दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी निंबळकचे शिवसेना शाखा प्रमुख बाळसाहेब कोतकर, निलेश पाडळे, मच्छिंद्र कोतकर आदी उपस्थित हेाते.


निवेदनात म्हंटले आहे की, सदरचा रस्त्याला अनेक दिवसांपसून मंजूरी मिळाली असूनही या ठिकाणचे काम बंदच होते. यानंतर काम सुरु करण्यात आले असून ते धिम्या गतिने सुरु आहे.


तसेच जे काम सुरु आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या संदर्भात वारंवार अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. मात्र त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळत नाही. वारंवार याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  तात्काळ  या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post