। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । संजय चोरडिया यांची सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. याबद्दल त्यांचा गोविंदपुरा येथील रहिवाशांकडून सत्कार करण्यात आला.
चोरडीया गेल्या 31 वर्षांपासून पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे. विश्वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश तसेच ज्योतिप्रिया सिंग यांच्यासोबत बर्याच कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता.
चोरडीया यांच्या मनमिळावू आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे ते परिसरात लोकप्रिय आहेत. निवडीबद्दल त्यांचा गोविंदपुरा येथील रहिवाशांकडून सत्कार करण्यात आला.
या वेळी शाकीर शेख, मोहसीन खान , प्रा. प्रकाश सोनार, विशाल घोडके, बेबी आपा, कावेरी सोनार, करुणा मनिकजडे, लक्ष्मी मिसाळ, कांचन मैड आदी उपस्थित होते.

