राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शेणाच्या गोवऱ्यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन

। मुंबई । दि.06 फेब्रुवारी । सध्या गॅस किंमतीमध्ये झालीली वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी राज्यभर शेणाच्या गोवर्‍यांनी चूल पेटवून तीव्र आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.


यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वाशिम येथे रस्त्यावर उतरून, चूलींवर भाकर्‍या भाजून मोदी सरकारचा निषेध केला. तसेच पुढील आंदोलन पेट्रोल पंपांवरील उज्वला गॅस योजनेबाबत लावलेल्या मोदींच्या होर्डिंग्ज विरोधात असेल, असा इशारा चाकणकर यांनी बोलताना दिला आहे.

 



गॅस दरवाढीच्या विरोधात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याबाबत केंद्र सरकार अजिबात संवेदनशील नाही. ही योजना 5 कोटी महिलांपर्यंत पोहोचवण्याची योजना होती. ती पोहोचली की नाही हे माहीत नाही, पण महिलांना मात्र या दरवाढीने मोदी सरकारने रडवले आहे.

 

या गॅस दरवाढीमुळे महिला वर्गाचे बजेट कोसळले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महिलांसाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. त्यामुळे हे सरकार महिलांच्या विरोधात आहे असा आरोप त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post