महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली

। अहमदनगर । दि.07 फेब्रुवारी । रस्त्याने पायी जाणार्‍या 76 वर्षीय  वृध्देच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची चेन मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी धूमस्टाईलने हिसकावुन चोरुन नेली हि घटना बुरुडगाव रोडवरील डॉक्टर कॉलनी मधील डॉक्टर ताडगौड यांच्या बंगल्या समोर शनिवारी (दि.6) रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.



याबाबतची माहिती अशी की, श्रीमती सुप्रिया सुरेश बडवे (वय 76, रा.बडवे निवास, जकात नाक्या जवळ, बुरुडगाव रोड) या डॉक्टर कॉलनी येथुन रस्त्याने पायी जात असताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील एक ग्रॅम वजनाची चेन बळजबरीने चोरुन नेली.


याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी श्रीमती सुप्रिया बडवे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 394, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विवेक पवार हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post