नरेंद्र फिरोदिया यांना मिळालेल्या पुरस्काराने पूर्ण नगरचा सन्मान : ब्रिजलाल सारडा


हिंदसेवा मंडळाच्या वतीने सत्कार

। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी ।   कर्मण्येवाधिकारस्ते या भगवद् गीतेत दिलेल्या संदेशाप्रमाणे कार्य करणाऱ्या नगर मधील फिरोदिया कुटुंब पिढ्यानपिढ्या निस्वार्थपणे सामाजिक काम करत आहे. नरेंद्र फिरोदिया हा वारसा जोपासत योगदान देत आहे.

 

त्यामुळेच टाईम्स सारख्या मोठ्या ग्रुपने नरेंद्र फिरोदिया यांच्या अष्टपैलू कार्याची दखल घेत त्यांना दिलेला टाईम्स मॅन ऑफ द इयर या मानाच्या पुरस्कार देवून केलेला सन्मान हा पूर्ण नगरचा सन्मान आहे, असे गौरोद्गार हिंदसेवा मंडळाचे माजी कर्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.


सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले नरेंद्र फिरोदिया यांना टाईम्स मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदसेवा मंडळाच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयात विशेष सत्कार सोहळ्यात माजी कर्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीज्ञ अशोक कोठारी होते. 

 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्यध्यक्ष अजित बोरा, कार्याक्रमचे संयोजक सुमतिलाल कोठारी, डॉ.पारस कोठारी, जगदीश झालानी, मधुसूदन सारडा, अशोक उपाध्ये, शामसुंदर सारडा, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले आदींसह नगरमधील हिंदसेवा मंडळाच्या सर्व शाळांमधील शिक्षकवृंद उपस्थित होते.

 

सत्कारास उत्तर देतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, टाईम्स सारख्या ग्रुपने दिलेला पुरस्कार हा जवाबदारी वाढवणारा आहे. त्यामुळे अधिक जास्त व चांगले काम करावे लागणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सत्कार स्वीकारणार नव्हतो, मात्र हिंदसेवा मंडळासारख्या मोठ्या जुन्या संस्थेस नाही म्हणता आले नाही. करोना नंतर आता डिजिटल शिक्षण सुरु झाले आहे. हिंदसेवा मंडळासारख्या चांगल्या संस्थेमधून सर्वात स्वस्त व दर्जेदार शिक्षण दिले जाता आहे. या डिजिटल माध्यमातून जरपूर्ण जगात कोठेही शिक्षण देण्याचा विचार केल्यास हिंदसेवा मंडळ ही वल्डक्लास एज्युकेशन देणारी संस्था होईल. अशा चांगल्या संस्थेस कायम सहकार्य करू.

Post a Comment

Previous Post Next Post