। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रहिवासींना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीचे निवेदन नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना भिंगार शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.कांता बोठे यांनी दिले. यावेळी संघटक स्मिता अष्टेकर उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरालगत असलेल्या भिंगारमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड अस्तित्वात असून, या भागातील नागरीक बर्याच वर्षांपासून मुलभुत सुविधापासून वंचित आहेत. या भागात होणारा पाण्याची समस्या बिकट असून, होणारा पाणी पुरवठा हा आठ दिवसांनी व अपुरा होत असतो.
तसेच या कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्याने या भागात दुमजली इमारतींना परवानगी नसल्याने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही मोठी समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून येथील नागरिकांना मुलभुत समस्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांची आहे.