। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । जिल्हा परिषद कार्यालयाच्या कम्पाउच्या भिंतीलगत लावलेली पन्नास हजार रुपये किंमतीची बजाज मोटार सायकल (क्र.एम.एच.16 सी.यु 2739) व एक हजार रुपये किंमतीचा लावा कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरानी चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.8) रोजी घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अशोक शिवाजी लगड (वय 33, रा.विद्यानगर, नगर-दौड रोड,नगर) यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक गाडगे हे करीत आहेत.
