एमआयडीसीत ए.टी.एम.फोडण्याचा प्रयत्न

। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी ।  कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोराने एटीएम मशीन मधील पैसे चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हि घटना एमआयडीसीतील एल.अ‍ॅण्ड टी कंपनी लगत असलेले एटीएम मध्ये शनिवारी (दि.13) पहाटेच्या सुमारास घडली.


या बाबतीची माहिती अशी की, एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनी लगत असलेल्या महिंद्रा कोटक बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये अज्ञात चोराने आत प्रवेश केला.


कशाच्यातरी सहाय्याने समोरील पत्रा उचकटुन एटीएम मशीनचे सिक्युरिटी लॉक तोडून आतील रोकड चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एटीएम फोडताना झालेल्या आवाजाने चोरट्याला एटीएम फोडणे शक्य न झाल्याने चोरट्याने तेथुन पळ काढला.


याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हर्षद कांतीलाल गुगळे (वय 34, रा.नानाजी नगर, व्हिडीओकॉन मागे, सारसनगर) यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 300,511 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक दाताळ हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post