। अहमदनगर । दि.14 फेब्रुवारी । जिल्हा पुरोगामी विचारांचा असून यामध्ये शिक्षकांचे कामकाज मोठे आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
गुरुकुल शिक्षक मंडळ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांचा मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे होते.
या वेळी मंत्री शंकरराव गडाख यांचा सत्कार करण्यात आला आहे. या प्रसंगी रा. या. आौटी, शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर, संजय धामणे, भास्कर नरसाळे, सूदर्शन शिंदे, सीताराम सावंत, अंबादास झावरे, सुखदेव मोहिते, सुनील जाजगे, वृषाली कडलग आदी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले की, शेतकर्यांना बंद झालेली पेन्शन योजना पूर्ववत सुरु करणे गरजेचे आहे. शिक्षक हा उद्योजकाचा मुलगा नसून शेतकर्याचा आहे. त्यामुळे ही पेन्शन शेतकर्यांसह सर्वांना लागू होणार आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवर आमदार म्हणून घेतल्यास शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल.
प्रास्ताविक नितीन काकडे यांनी केले. औटी म्हणाले की केंद्र प्रमुखाची पदे रिक्त असल्यामुळे ती कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. त्यामुळे ती पदे त्वरीत भरण्यात यावीत, असे ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांचा भाषणे झाली.
