। अहमदनगर । दि.28 फेब्रुवारी । वीज पंपाची केबल काढत असताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांबे येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.
संगमनेर तालुक्यातील नेहारवाडी खांबे येथील नितीन बापू भोंडे (वय 37) हा तरुण सार्वजनीक पाणी पुरवठा करण्याच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतील वीज पंपाची केबल काढत होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला.
विहिरीत पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला विहिरीबाहेर काढत संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.