एसीबी कारवाईवरुन
राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
। अहमदनगर । दि.28 फेब्रुवारी । चित्रा वाघ याच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने कारवाई केल्या प्रकरणी बोलताना विखे म्हणाले, नाचता येईना अन अंगण वाकडं अशी राज्यसरकारची गत झालीय. त्यामुळे एसीबीचा धाक दाखवणं किंवा इतर पद्धतीने भीती दाखवण्याचा प्रकार आहे. पण सरकारने कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही, असंही मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संजय राठोड प्रकरणी सगळे पुरावे समोर आहेत. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत पोलीस ज्या तत्परतेने गुन्हा दाखल करतात, इथं तर एका मुलीचा मृत्यू झालाय. ती आत्महत्या नसून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण तसं झालेलं नाही.
पोलीस निर्ढावल्यासारखे वागत आहेत. पोलीस कुणाच्या इशार्यावर असं वागत आहेत? संजय राठोड यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. किंवा सरकारकडे नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी.