। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी । गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरातून दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून दान पेटीमधील अंदाजे 70 हजारांची रक्कम चोरुन नेल्याची घटना निमगाव गांगर्डा, ता.कर्जत येथे शुक्रवार (दि.26) रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत अशोक भैरु चव्हाण (वय 57, रा.निमागांव गांगर्डा) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निमगांव गांगर्डा गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर सभा मंडपात ठेवलेली.
लाकडी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी गुरवारी दि.25 सायंकाळी 7 ते शुक्रवारी दि.26 सकाळी 6 वाजण्यच्या दरम्यान पळविली. मंदिराच्या पाठीमागे असणार्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सदरची दानपेटी घेवून गेले.
त्यातील अंदाजे 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेत फोडलेली दानपेटी तेथे टाकून देवून पोबारा केला आहे. या फिर्यादीवरुन कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.