उपनगरात मंगळसुत्र चोरीच्या दोन घटना

। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी । रस्त्याने पायी जाणार्‍या 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी चोरट्यांनी हिसकावुन तोडून चोरुन नेले ही घटना गुलमोहर रोड येथे सोमवार (दि.8)  रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.


याबाबतची माहिती अशी की, प्रतिभा प्रशांत त्रिंबके (वय 50, रा.मार्कडेय कॉलनी, गुलमोहर रोड, नगर) काही कामानिमित्त बाहेर जात असताना मोटारसायकवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे  वजनाची सोन्याचे गंठण, दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण असा ऐवज हिसकावून नेला.


या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी प्रतीभा त्रिंबेके यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक समाधान सोळें हे करीत आहेत.


दुसर्‍या घटनेची माहिती अशी की, सौ.शुभांगी कृष्णा गोसावी (वय 60, रा.आरती अपार्टमंन्ट, गायकवाड मळा, बालिकाश्रम रोड) या देवळात दर्शन घेण्यासाठी रस्त्याने पायी जात असताना मोटार सायकल वरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरुन नेले. ही घटना (दि.8) रोजी घडली.


याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शुभांगी गोसावी यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गुंड हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post