सासर्‍याचा सुनेवर अत्याचार ; गुन्हा दाखल

। नगर । दि.09 फेब्रुवारी ।  स्वत:च्या मुलाच्या संमतीने एकाने सुनेवर अत्याचार करून ठार मारण्याची धमकीदिल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरातील ढोलेवाडी परिसरात घडली आहे. पीडितेच्या पतीसह तिच्या सासर्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संगमनेर शहर पोलीस अमित महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 26 डिसेंबर 2020 ते 6 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान घडला असून याप्रकरणी सुनेने दिलेल्या फिर्यादीनुसार सासरा व पती अशा दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याची कारवाई सुरू केली आहे. संगमनेरातील डोलेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा विवाह झाला.दरम्यानच्या काळात या विवाहितेशी तिच्या सासर्‍याने वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला.


मात्र आपला संसार मोडला जाऊ नये यासाठी तिने कुठे वाच्यता केली नाही. दरम्यान आरोपी सासरा व पती यांनी विवाहितेला लाकडी दांडक्याने मारहाणही केली. शिवीगाळ व दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संगमनेरचे पोलिस अंमलदार व्ही. जी. खाडे यांनी सासरा व पतीवर गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post