बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
बोरुडे यांचा फुले ब्रिगेडच्या वतीने सत्कार
। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी ।महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल फुले ब्रिगेडच्या वतीने त्यांचा माळीवाडा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दिपक खेडकर, डॉ.सुदर्शन गोरे, बजरंग भूतारे, विष्णूपंत म्हस्के, किरण जावळे, नितीन डागवाले, महेश सुडके, मोहित सत्रे, विक्रम बोरुडे, गणेश शेलार, प्रसाद बनकर, गणेश जाधव, विकास खेडकर, प्रविण वारे, विश्वास शिंदे, श्रीकांत आंबेकर, आशिष भगत आदी उपस्थित होते.
दिपक खेडकर म्हणाले की, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम केले. कोरोना व महागाईच्या संकटात माणुसकीच्या भावनेने अनेक गरजूंना आरोग्यसुविधा देण्याचे अविरत सुरु असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. संघटनेच्या माध्यमातून शासनस्तरावर विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील ते कटिबध्द राहणार आहेत.
कार्य करण्याची तळमळ असल्यास तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवितो. याप्रमाणे बोरुडे यांचे समाजात सर्वसमावेशक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे यांनी इतरांचे प्रश्न सोडविण्याचा ध्यास घेऊन समाजात योगदान देत आहे. संघटनेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.