निंबळक-नागापूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा : डॉ. दिलीप पवार

एमआयडीसीच्या कार्यकारी अभियत्यांना निवेदन

निंबळक-नागापूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा :  डॉ. दिलीप पवार

। अहिल्यानगर । दि.23 मे 2024 । नगर-मनमाड रस्त्यावरील नागापूर चौक ते निंबळक एमआयडीसी हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेली चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर निंबळक-नागापूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संदीप बडगे यांना निवेदन देण्यात आले.

👉 क्लिक करुन वाचा ...  

या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील अनेकवेळा निवेदने देऊनही रस्त्याचे डांबरीकरण, दुभाजक आदी कामांना सुरुवात झालेली नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

👉 क्लिक करुन वाचा ...  

विभागीय कार्यालयात सदर विषय प्रलंबित असल्याचे सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.सदर रस्त्याचे काम नवीन ठेकेदार कंपनीमार्फत तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सदर काम पंधरा ते वीस दिवसात चालू करण्यात येईल, असे बड़गे यांनी सांगितले.  यावेळी बी. डी. कोतकर, संजय भोर, शिवाजी दिवटे, नवनाथ काळे आदी उपस्थित होते.

👉 क्लिक करुन वाचा ...  

Post a Comment

Previous Post Next Post