। अहिल्यानगर । दि.21 मे 2025 । राज्य सरकारने आज सायंकाळी उशिरा आयएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला. यामध्ये आठ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची अमरावती जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवर भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची बदली झाली आहे.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे -
नवल किशोर राम (IAS:RR:2008) यांची पुणे महानगरपालिका, पुणे येथील महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती शीतल तेली-उगले (IAS:SCS:2009) यांची पुणे येथील क्रीडा आणि युवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) जिल्हाधिकारी, धुळे यांची विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग, छत्रपती संभाजी नगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सी.के. डांगे (IAS:SCS:2010) यांची मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरभ कटियार (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, अमरावती यांची मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) मुख्य प्रशासकीय अधिकारी, (नवीन टाउनशिप), सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आशिष येरेकर (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.