गॅस सिलेंंडरच्या किंमतीत वाढ!

। नवी दिल्ली । दि.25 फेब्रुवारी । स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे.


आयओसीने फेब्रुवारी महिन्यात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तिसर्‍यांदा वाढ केली आहे. यापूर्वी 4 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारीला किंमती वाढविण्यात आल्या होत्या.


राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजीच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. आज गुरुवारी (25 फेब्रुवारी 2021) दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 769 रुपयांवरून वाढून 794 रुपयांवर गेली आहे. 


डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत दोनदा वाढ करण्यात आली होती. 1 डिसेंबर रोजी त्याचा दर 594 रुपयांवरून 644 रुपये करण्यात आला आणि नंतर 15 डिसेंबरला त्याची किंमत पुन्हा वाढवून 694 रुपये केली गेली.


म्हणजेच एका महिन्यात 100 रुपये वाढविण्यात आले. परंतु जानेवारीत किंमती वाढविण्यात आल्या नाहीत. जानेवारीत विना अनुदानित एलपीजी (14.2 केजी) ची किंमत 694 रुपये होती.

 

कसे वाढले दर?

-1 डिसेंबर रोजी दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले

-1 जानेवारी रोजी दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले

-4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले

-15 फेब्रुवारी रोजी दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले

-25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले

Post a Comment

Previous Post Next Post